Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वजन वाढलंय , Tenshion येतंय !! मग हे नक्की करा !! #weight problem


             

        वजन वाढणे , लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीमधील एक मोठी समस्या बनली आहे ,आजकाल जाडेपणा हि समस्या सर्वांनाच भेडसावत आहे, यामुळे लोकांना काही घातक आजारांना सामोरे जावे लागते उदा. सांधेदुखी, कॅन्सर, अनिद्रा, डायबेटीज, हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी इत्यादी. या आजारांवर उपाय करण्यासाठी लोक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात आणि वेगवेगळे उपाय करून बघतात पण बऱ्याचदा त्यांना याचा फायदा होत नाही. लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.

वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे ठरते.वजन कमी करणे हे सोप आहे, ज्यांच्यावर आपण घरगुती उपाय करू शकता. कमी कष्ट घेऊन जर वजन कमी करायचे असल्यास काही सोप्या पद्धतीचे घरगुती उपाय आहेत.आजकाल जाडेपणा हि समस्या सर्वांनाच भेडसावत आहे या समेसेच्या निवारणासाठी आपण घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून वजन नियंत्रित करू शकता.

कडीपत्ता हा खाण्यातील खूपच गरजेचं साहित्य आहे. जो चवीसोबत खाणं बघण्यासाठीही डिलिशियस बनवतं. कडीपत्ता जर का तुमच्या खाण्यात दररोज वापरल्यास बेड कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवणारे सेल्स देखील कमी करण्याचं काम करतो. हे शरीरातील फॅट जाळण्यात मदत करतो त्यासोबतच हे शरीरात संग्रहीत लिपिड स्तर आणि ट्राइग्लिसराइड्स देखील कमी करतात. दालचिनी खाल्याने भूक पण कमी लागते, ज्यामुळे नको असलेली चरबी शरीरावर जमा होत नाही.आल आणि जीरा हे असे मसाले आहेत ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते, फक्त एक चमचा जीरा खाल्याने शरीरातील चरबी चे प्रमाण कमी होण्यास मदत होते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आल फक्त गुणकारी मसाला नाही तर आल हे एक प्रकारे औषधच आहे, आल देखील आपल्या शरीरातील रक्तातील शुगर चे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो.



- मेथी पूड  वापरल्याने पोटभरल्यासारखं लागतं आणि भूक लागत नाही. आणि शरीरातलं साखरेचं प्रमाणही नियंत्रित ठेवते.

 - ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. 

- कॉफी एक स्ट्रॉंग पेय आहे. बिनसाखरेचे, दिवसातून १-२ वेळा घ्यायला काय हरकत आहे. भरपूर प्रमाणात शरीरातलं मेटाबोलिसम वाढवत, ज्यांनी नकळत कॅलोरी बर्न होतात. हा, जास्त सेवन नेहमीच हानिकारक. 

- दररोज सकाळी व संध्याकाळी चालावे. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली करावी.

- रात्री हलका आहार घ्यावा.भात पुर्णपने बंद करावा.

मिठ जितके कमी खाल्ले जाईल तितकी सूज व स्थूलपणा कमी होतो त्यामुळे जेवणात वरून मीठ घेऊ नये .

- साखर, बटाटा आणि तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट जास्त प्रमाणात असते त्यामुळे हे पदार्थ कमीप्रमाणात खाणे कधीही योग्य आहे. हे पदार्थ न खाल्याने वजन कमी होऊ शकतो.

- दररोज दह्याचे सेवन केल्यानी अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच प्रत्येक दिवशी सकाळी रिक्याम्या पोठी एक ग्लास भर घरात तयार केलेले ताक प्यावे. त्यामुळे वजन कमी होते.

- फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे.प्रक्रिया केलेले फळं आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात.गाजर पालक सफरचंद पपई खाण्यावर जास्त भर द्या .तसेच चिक्कु, केळी,द्राक्ष,आंबा ही फळ सोडुन बाकी सर्व फळ खावीत.


- पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे कॅलरीज कमी होतील. तसेच गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पियाल्याने वजन कमी करण्यास जास्त फायदेशीर ठरते.

- सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

- आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

- साखरेचे गोड पदार्थ चॉकलेट विविध मिठाई  बेकरी प्रोडक्ट तेला तुपाचे पदार्थ साकर बटाटा खाऊ नये.

साभार : इंटरनेट